TY - BOOK AU - Sawant, S TI - Yughandhar SN - 8174210814 U1 - 891.46 PY - 2020/// CY - Pune PB - Contenentel Prakashan KW - General N1 - 1530; Yughandhar N2 - हि कादंबरी जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला वाटेल कि तूमचा सवांद श्री कृष्णा सोबत आता सुरु झाला आहे. या कादंबरीचे महत्व असेल आहे कि यामध्ये श्री कृष्ण देव, परमात्मा, भगवान असा राहत नाही तर तो आपला मित्र , भाऊ, सोबती आहे असे वाटायला लागते. यामध्ये श्रीकृष्णाची कथा लेखक त्याच्या जीवनातील वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे सांगतो. ज्यामध्ये स्वतःचा समावेश देखील आहे. श्री कृष्णाच्या भावनिक दृष्ट्या जवळचे लोक, गोकुळमधील बहीण ज्याबद्दल अनेकदा बोलले जात नाही, पाण्याशी असलेले नाते आणि पाण्याशी विशेष नाते असलेले इतर पुरुष यांसारख्या अनेक गोष्ष्टी लेखक शिवाजी सावंत स्पष्ट करतात. श्री कृष्णने गोकुळमधील त्याचे बालपण आणि मथुरा आणि अवंती येथील सांदिपिनी आश्रमातील दिवसांचे वर्णन केले आहे. तर इतर लोक त्याच्या उर्वरित आयुष्याची कहाणी सांगतात. रुक्मिणीने श्रीकृष्णाशी केलेल्या तिच्या विवाहाची आणि भारताच्या पश्चिम किनार्‍याजवळील असलेल्या द्वारकेची गोष्ट सुद्धा सांगितली आहे. असे वाटते की युगंधर कादंबरी चे लेखक हणजेच शिवाजी सावंत श्रीकृष्णाला समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा त्यांच्याबरोबर राहणाऱ्या लोकांच्या नजरेतून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्हाला जर श्री कृष्णाला जर जवळून अनुभवायचे असेल तर तुम्ही Yugandhar By Shivaji Sawant हि कादंबरी वाचली पाहिजे ER -