TY - BOOK AU - Devre, S TI - Manse Marayachi Raang SN - 9789387042513 U1 - 891.46 PY - 2019/// CY - Nagpur PB - Vijay Prakashan KW - General N1 - 1530; Manse Marayachi Raang N2 - 'माणसं मरायची रांग' या कथासंग्रहात डॉ. सुधीर देवरे यांनी पंचवीस कथांचा सुंदर गोफ विणला आहे. त्यांच्या या कथासंग्रहाचे मुख्य सूत्र म्हणजे, 'माणसं जगत असताना रोज पावलोपावली या ना त्या निमित्ताने मरतच राहतात!' त्यांच्या कथांचा विषय साधा, पण आशय मात्र गहन आहे. मानवी जीवनाच्या सुख-दु:खाच्या, यश-अपयशाच्या, प्रगती-अधोगतीच्या, गरिबी-श्रीमंतीच्या, जन्म-मृत्यूच्या प्रश्नांना डॉ. देवरेंनी आपल्या या कथांत न्याय दिला आहे. जीवन मरणाच्या उंबरठ्यावर निखळ सुख असं काही वास्तवात नसतं. तरीही अगदी छोट्या घटनाही माणसाच्या आयुष्यात केव्हा सुखाच्या, तर केव्हा दु:खाच्या लाटा निर्माण करीत असतात. एकविसाव्या शतकातला प्रत्येक माणूस 'माणसं मरायची रांग'चा प्रतिनिधी आहे. ह्या कथासंग्रहातल्या प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे. त्यात सूक्ष्म रूपाने केलेल्या निरीक्षणाचं चिंतन येत राहतं ER -