Arungandha (Marathi Edition )
Material type:
- 9789390869145
- 891.46/ TAP
1530 2025-02-12
अरुण बोऱ्हाडे या कामगार नेत्याचा साहित्यिक, सामाजिक, कामगार व राजकीय कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा ‘अरुणगंध’ हा गौरवग्रंथ संदीप भानुदास तापकीर यांनी संपादित केला आहे. या गौरवग्रंथामध्ये साहित्यिक अनुबंध, शालेय जडणघडण, जन्मभूमी मोशीतून, कर्मभूमी एच.ए.मधून, कामगार चळवळ, सामाजिक अनुबंध, राजकीय अनुबंध, गिर्यारोहण व पर्यटन आणि कौटुंबिक अनुबंध हे नऊ विभाग असून, यात ११९ लेखांचा समावेश आहे. ‘अरुण बोऱ्हाडे हे कामगार चळवळीतून पुढे आलेले समाजनिष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा घेणारा ‘अरुणगंध’ हा गौरवग्रंथ वाचकांना कामगार वस्त्यांमध्येच नव्हे, तर साहित्याच्या प्रांतात, रानावनात, गडकिल्ल्यांमध्ये घेऊन जातो. ‘अरुणगंध’चा दरवळ युवापिढीला मोहित आणि प्रेरित करेल यात शंका नाही!’ मा. शरद पवार (माजी संरक्षणमंत्री, भारत सरकार)
There are no comments on this title.