000 04208nam a22001937a 4500
005 20250303111255.0
020 _a9788197154546
082 _a891.46
_bKHE
100 _aKher, R
245 _aRam
_bTretayougacha Mahasangram, Puroshotam Kadambari Malika bhag 2
250 _a1
260 _aMumbai
_bHeadwig Media House
_c2024
300 _a459
_ePB
500 _a1530
_b2025-02-12
505 _aRam Tretayougacha Mahasangram, Puroshotam Kadambari Malika bhag 2
520 _aअखेर त्या महायुद्धाला प्रारंभ झाला. दुंदुभी, नगारे, झांजा, शंख आदी रणवाद्यांच्या प्रचंड घोषानं सारी लंका हादरून गेली. त्यातच उभय पक्षातून जबघोष आणि आरोळ्या उठू लागल्या. एकच कल्लोळ माजून राहिला. राम हनुमानाच्या खांद्यावर वसला; आणि त्यानं धनुष्याचा टणत्कार केला. उभय पक्षाची सेना भेदरून त्याच्याकडे पाहू लागली. रामानं भराभर वेगवान तीक्ष्ण बाण सोडायला प्रारंभ केला... केवळ चार घटकात रामानं राक्षससैन्याचा पुरता विध्वंस केला. गज, पदाती आणि अश्व यांच्या मृतदेहांचा ढीग रणभूमीवर पडला. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या रुद्राची ती जणु क्रीडाभूमीच असल्यासारखं वाटू लागलं. रामाच्या संहाराखातून उरलेले राक्षससेनानीही अवयव तुटल्यामुळे युद्धाला निरुपयोगी झाले होते. वानरसेनेत मात्र आनंदी आनंद पसरला होता. सगळे वानर रामाची प्रशंसा करत होते. कडवं राखीव सैन्यदलही परास्त झाल्यानंतर युद्धात स्वतः उतरण्याखेरीज रावणाला आता गत्यंतर उरलं नव्हतं. ** वाल्मीकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून, तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षांपूर्वी घडून गेलेला देदीप्यमान इतिहास आहे. रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचं स्वरूप आणि कार्य, गृध्र जटायूचं वास्तविक स्वरूप, वानरांची वास्तविकता, पुष्पक विमानाचं स्वरूप, रावणाचं साम्राज्य, दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण, आदी गोष्टी - घटना आजच्या शोधांशी ताडून बघितल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचतो आहोत याचा अनुभव वाचकांना मिळेल.
650 _aGeneral
942 _cBK
999 _c225872
_d225872